Muktai Sports Education and Multipurpose Institute, Lavangi
मुक्ताई क्रीडा शिक्षण व बहुद्देशीय संस्था, लवंगी
Founder's Message - Swa Muktai Sports, Education and Multipurpose संस्था, Lavangi is a socially driven organization inspired by community-oriented values, working to bring positive change in the fields of disability support, sports, and education. The main objective of the संस्था is to provide opportunities, guidance, and support to underprivileged, needy, and specially-abled individuals in society. The organization was established with a strong commitment to social service. It implements various initiatives to deliver essential facilities, training, and assistance to rural and disadvantaged communities. Continuous efforts are made in areas such as empowering persons with disabilities, fostering a love for sports among youth, and providing educational support to students. We believe that every individual has potential — and with the right opportunities, guidance, and support, that potential can contribute to societal progress. The संस्था operates on the values of equal opportunity, self-reliance, and social unity. The organization places the highest importance on transparency, social responsibility, and humanity. Our goal is to bring about positive and sustainable change through the participation of all sections of society.
संस्थापक संदेश - स्व मुक्ताई क्रीडा शिक्षण व बहुद्देशीय संस्था, लवंगी ही समाजाभिमुख विचारांनी प्रेरित सामाजिक संस्था असून दिव्यांग, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. समाजातील वंचित, गरजू आणि विशेष गरज असलेल्या व्यक्तींना संधी, मार्गदर्शन आणि आधार देणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. संस्थेची स्थापना समाजसेवेच्या दृढ उद्देशाने करण्यात आली. ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत आवश्यक सुविधा, प्रशिक्षण आणि सहाय्य पोहोचवण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते. अनाथ दिव्यांग सक्षमीकरण, युवकांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे या क्षेत्रांत सातत्याने काम केले जाते. आमचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीत क्षमता आहे — योग्य संधी, मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्यास ती क्षमता समाजाच्या प्रगतीस हातभार लावू शकते. समान संधी, स्वावलंबन आणि सामाजिक एकात्मता या मूल्यांवर संस्था कार्य करते. संस्था पारदर्शकता, सामाजिक जबाबदारी आणि मानवतेच्या भावनेला सर्वोच्च मान देते. समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून सकारात्मक आणि टिकाऊ बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे.
Our vision is to create an inclusive, educational, and healthy society where every individual has equal opportunities. Our vision is to build a positive and empowered community where every segment of society thrives on its own potential.
प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणारा, अनाथ दिव्यांग-समावेशक, शिक्षणप्रधान आणि आरोग्यदायी समाज निर्माण करणे. समाजातील प्रत्येक घटक स्वतःच्या क्षमतेवर उभा राहून प्रगती करेल — असा सकारात्मक आणि सशक्त समुदाय उभारणे हा आमचा दृष्टिकोन आहे.
The main mission of the organization is to empower the disabled, needy and disadvantaged sections of the society, increase their self-confidence through education and sports, and provide them with the necessary opportunities to lead a self-reliant life. Our commitment is to create development based on social equality, dignity and participation.
समाजातील अनाथ निराधार दिव्यंग, गरजू व वंचित घटकांना सक्षम बनवणे, शिक्षण व क्रीडा माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. सामाजिक समता, सन्मान आणि सहभाग यांवर आधारित विकास घडवणे ही आमची बांधिलकी आहे.
Founded with a spirit of service, Swat Muktai Sports Education and Multipurpose Institute, Lavangi has been dedicated to the rehabilitation and care of intellectually disabled children in Lavangi since 2004.
सेवाभावी वृत्तीने स्थापित, स्व.मुक्ताई क्रीडा शिक्षण व बहुद्देशीय संस्था, लवंगी २००४ पासून लवंगी येथील मतिमंद मुलांच्या पुनर्वसन आणि सेवेसाठी समर्पित आहे.
Compassion, Integrity, and selfless Service are the pillars of our institution.
करुणा, सचोटी आणि निस्वार्थ सेवा हे आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत.